Type Here to Get Search Results !

फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करणा-या दोघांना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक

        सोलापूर ग्रामीण पोलीसांची विषेश कामगिरी
*फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करणा-या दोघांना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक....*
         मागील काही महिन्यांपासून फेसबुक वरील प्रोफाईलची काॅपी करून फेक प्रोफाईल बनवून सदरची व्यक्ती ही तिच आहे असे भासवून वेगवेगळया अडचणी असल्याचे कारणे सांगून तात्काळ पैशाची आवश्यकता असल्याचे भासवून *फोन पे व्दारे / गुगल पे* इत्यादी सारख्या ऑनलाईन अँपव्दारे पैशाची मागणी करण्याचे प्रकारामध्ये वाढ झालेली आहे. 
सामान्यतः समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी इत्यादी व्यक्तींचे मुख्यतः फेक प्रोफाईल बनवून फसवणूकदार पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 
माहे जानेवारी२०२१ मध्ये सोलापूर जिल्हयातील
 *एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फेसबुक फेक अकाउन्ट*
 तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट 
(friend request) पाठवून पैशांची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना
 *फोन पे / गुगल पे* चे नंबर देवून सदर मोबाईल नंबरवर पैसे पाठविण्याबाबत सांगितले. 
त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे १०,००० रू. व ७,००० रू. रक्कम संबंधीत मोबाईल नंबर वर रजिस्टर असलेल्या फोन पे व गुगल पे अकाउन्टवर पैसे पाठवून त्यांची फसवणूक केल्याने
 *माढा पोलीस ठाणे येथे गु.रं.न. 22/2021 भा.द.वि.संक 419, 420 व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे* गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
तसेच माहे आक्टोंबर २०२१ मध्ये *मा. पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे फेसबुक वरील प्रोफाईल ची माहिती काॅपी करून त्याचसारखे बनावट फेसबुक अकाउन्ट तयार करून त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना थ्तपमदक त्मुनमेज पाठवून पैशाची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना मोबाईल नंबर देवून त्यावर रजिस्टर असलेल्या फोन पे / गुगल पे अकाउन्टवर पैसे पाठविण्याबाबत सांगितल्याने सदरची बाब गंभीर असल्याने अज्ञात इसमाविरूध्द *सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गु.रं.न. 821/2021 भा.द.वि.संक 419, 420 इत्यादी व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी), (डी) प्रमाणे*
 गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दोन्ही गुन्हयाचा 
*तपास सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे, प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे*
 यांचेकडे देण्यात आलेला होता.
 सदर दोन्ही गुन्हयांचा
 *तांत्रिक तपास व विश्लेषण* करून सदर गुन्हयातील आरोपींची माहिती निष्पन्न करून 
*मा. पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे, स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील*, यांचे मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करून त्यांना सदर गुन्हयाबाबत माहिती सांगून त्यांना
 *उत्तरप्रदेश, व राजस्थान*
 या ठिकाणी रवाना करण्यात आले.
सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्हयातील १-१ असे एकूण ०२ आरोपीतांना गुन्हा करण्याकरीता वापरलेले मोबाईल फोन तपासकामी जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले. 
वरील दोन्ही गुन्हयातील आरोपींना मे.. न्यायालयात हजर केले असता त्यांना २० डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
*सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्षनाखाली, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत पाडूळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील, यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि. शांताराम शेळके, पो.स.ई. गणेश पिंगुवाले, शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, पोलीस अंमलदार मनोज भंडारी, मोहन मनसावाले, विशाल टिंगरे,सचिन मसलखांब, सचिन दरदरे, अन्वर अत्तार, अर्जून केवळे यांनी केली आहे.*


⭕सदर घटनेचे गांभीर्य ओळखून व अशा प्रकारच्या वाढत असलेल्या घटना यांना प्रतिबंध होणेकरीता लोकांमध्ये सायबर जागरूक्ता असणे आवश्यक आहे. 

⭕फेसबुक प्रोफाईल ची माहिती व प्रोफाईल फोटो लाॅक करणे आवश्यक आहे.

⭕फेसबुक प्रोफाईल मधील फ्रेन्ड लिस्ट
 (Friend List) कोणालाही दिसणार नाही याकरीता
 Who can see your friend list यामध्ये Onle me हे ऑप्शन सिलेक्ट करावा.

⭕बनावट फेसबुक अकाउन्टव्दारे कोणीही पैशाची मागणी करीत असल्यास संबंधीत व्यक्ती सोबत व्यवहार करण्यापूर्वी खात्री करणे आवश्यक आहे.

⭕बनावट फेसबुक अकाउन्ट तयार झाले असल्यास तात्काळ रिपोर्ट मध्ये Pretending to me हे ऑप्शन सिलेक्ट करून फेक अकाउन्ट तात्काळ बंद करावे. 

⭕कोणत्याही अनोळखी व्यक्तीची Friend Request Accept करू नये.

⭕ कोणत्याही व्यक्तीला अपव्दारे / फोन व्दारे / एसएमएस व्दारे आपल्या बॅंक खात्याची / डेबिट / क्रेडिट कार्ड संबंधी गोपनीय माहिती देवू नये.

⭕ कोणत्याही कंपनी / सव्र्हिसेस यांची माहिती कस्टमर केअर नंबर इत्यादी गुगलवर सर्च करू नये.
 त्याकरीता संबंधीत कंपनी / सव्र्हिसेस च्याऑफिसिएल साईटवर जावून खात्री करूनच त्यांना संपर्क करण्यात यावा. 
तसेच अज्ञात व्यक्तींचा फोन आला असता कोणत्याही प्रकारी वैयक्तीक व बॅंकेसंदर्भातील माहिती देवू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News