उमरखेड येथे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली. ज्यात विदर्भ प्रांत स्तरावर निवडलेली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ज्यात जिल्हा संयोजक म्हणून समाजसेवी मा. श्री. अमोल दुमारे पाटील यांची व सह संयोजक म्हणून मा.श्री. मारोती पिलवंड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.यावेळी मा. श्री. प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक जनजाती चेतना परिषद विदर्भ तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र यानी मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणून मा.आम.नामदेवजी ससाने उपस्थित होते.
यावेळी मा.आम.नामदेव जी ससाने यांनी पुढिल जनजाती पिढिच्या उज्वल भविष्या करीता जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने आयोजित जनजागरन आंदोलन,भव्य जनजाती जिल्हा संमेलन, मा.राष्ट्रपती, मा.प्रधानमंत्री याना समाजाचा ठराव पाठविने या सर्व सामाजीक उपक्रमात आपन सर्व सक्रिय सहभागी होउ या असे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर मा.रमेशजी आत्राम प्रांत संघटन मंत्री,विदर्भ,मा.अमोल दुमारे,जिल्हा संयोजक जनजाती सुरक्षा मंच, श्री.गोपालजी भगत.मा.काशीनाथ जी आढाव,जिल्हा सचिव,जनजाती कल्याण आश्रम.मा.प्रल्हाद दुमारे,श्रध्दा जागरन प्रमुख, मा.लाडबाजी भीसे, जिल्हा संघटन मंत्री, मार्गदर्शक म्हणून मा.शिवहरी दुमारे,मा.गोविंद जी भिसे, मा. परशराम ब्रम्हटेके, सोबत मा.बाबुसींगजी जाधव,मा.शंकरजी झामडे.मा.अर्जुन रनमले, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते_