वार्ताहर (कैलास गायकवाड )शुक्रवार,दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक २०२१ - २०२६ साठी बँकेचे विद्यमान संचालक तथा राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचा “अ वर्ग” मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.*
*याप्रसंगी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.विष्णूकाका हिंगे, आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे मा.सभापती श्री.कैलासबुवा काळे, मा.सभापती श्री.वंसतराव भालेराव, शरद सहकारी बँक उपाध्यक्ष मा.शिवाजीराव लोंढे,कामगार नेते मा.बाळासाहेब बाणखेले, कॉग्रेसचे विक्रम भोर, भिमाशंकर साखर कारखाना संचालक मा.शांताराम बापू हिंगे, मा.रामचंद्र ढोबळे, खरेदी विक्री संघ संचालक श्री.नवनाथ हुले, श्री.सूर्यकांत थोरात, श्री.अनिल वाळूंज, मा.वामनराव जाधव, मा.उपसरपंच दिनेश खेडकर, तालुकाध्यक्ष श्री.रविबापू काळे, कोंढापुरी गावचे मा.सरपंच स्वप्निलभैय्या गायकवाड यांच्यासह शिरुर-आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सोसायटी प्रतिfनिधी आदि उपस्थित होते.*