राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व सातारा जिल्हा प्रभारी मा.श्री. संकल्प ( दादा )हनुमंतराव डोळस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज कार्य म्हणुन रक्तदान शिबीर संकल्पभैय्या डोळस युवा मंच दसुर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवामंचाचे अध्यक्ष मा.किरण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरांमध्ये एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काटे यांचा सत्कार संकल्पभैय्या डोळस यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पंढरपूर ब्लड बँकेचे डॉक्टर उपाध्ये साहेब यांचा सत्कार युवामंचा चे उपाध्यक्ष दत्तात्रय गवळी यांच्या हस्ते करण्यात आला व सर्व रक्तदात्यांचा सन्मानपत्र बॅग श्रीफळ व फेटा देऊन सत्कार शहारुख मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाहरुख मुलाणी, वैभव काटकर, रवींद्र माने, किरण सावंत, ज्ञानेश्वर कागदे, प्रथमेश उबाळे, सुजित पाचरणे,प्रशांत शिरसाट, अरबाज मुलाणी, दत्तात्रय गवळी, भागवत काळे, अक्षय शिंदे, अशोक आव्हाड, संतोष ढाळे, स्वागत खपाले, सूरज बागल, वैभव गवळी, विशाल गवळी, ऋतिक लोंढे, महेश सावंत, योगेश नाईकनवरे, पांडुरंग पाचरणे, अक्षय लोखंडे, सुरज काटे युवा मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.