मनसेच्या आक्रोश मोर्चा मध्ये महिला पुरुषांची हजारो ची गर्दी
प्रतिनिधी :- रफिक आतार
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी.कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन चालू आहे,, पन्नास पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी देखील सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही,,
या झोपलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथे श्री विठ्ठल भगवंताचा अभिषेक करून या झोपलेल्या सरकारला सुबुद्धी द्यावि यासाठी साकडे घातले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालय येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेत्रत्वाखाली महिला ,पुरुषांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला,पंढरपूर येथील नामदेव पायरीजवळ मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला,
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुनभाऊ कोळी, मनसे चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयवंत
भोसले,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, आप्पा करचे, पंढरपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, नगरसेवक अक्षय गंगेकर,जैनुदिन शेख, सचिन पाटील, श्रीकांत शिंदे,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष संतोष कवडे, जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष सिद्धेश्वर गरड,शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष दिलीप पाचंगे, महादेव मांढरे, बापू घोलप, रवी शिंदे, उपाध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपळणेरकर, सुमित शिंदे, दाजी शिंदे, महादेव मांढरे, शुभम काकडे,चंदू पवार, विनोद बाबर, अनिल केदार, आकाश लांडे, सागर लोकरे, आबासाहेब ढवळे, अमर कुलकर्णी, सतीश दिडवाघ, दत्ता विटकर, बाळू साळुंखे ,
,सर्व एस, टी, कर्मचारी उपस्थित होते,,यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की राज्य सरकार जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे, आंदोलन चिरडण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहे हे त्वरित थांबवावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,,
शासनाने सर्व एस, टी, कर्मचाऱ्यांना त्वरित शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावे अशी मागणी केली,ओबीसी समाजाचा एमपेरिकल डेटा त्वरित सादर करावा, आवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज कनेक्शन कट करू नये, पंढरपूर येथे एम आय डी सी मंजूर करावी, महादेव कोळी समाजाचे दाखले मिळावेत, साफसफाई कामगार मेहतर समाजाला घरे मिळावीत, झोपडपट्टी त कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांना सीटी सर्वे उतारा मिळावा या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,,