Type Here to Get Search Results !

श्रीराम पूर्ण क्षमतेने सुरु : उद्दिष्टा प्रमाणे ५ लाख मे. टन गाळप करणार

श्रीराम पूर्ण क्षमतेने सुरु : उद्दिष्टा प्रमाणे ५ लाख मे. टन गाळप करणार

      फलटण दि. १४
: जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे यावर्षीच्या हंगामात दि. १६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाचे एफआरपी २७६१ रुपये प्रतिटन प्रमाणे होणारे ऊस पेमेंट आज मंगळवार दि. १४ डिसेंबर रोजी संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कळविले आहे.
    या कालावधीत ३७१२४.७०२ मे. टन ऊस गाळप झाले असून एफआरपी प्रति टन २७६१ रुपये प्रमाणे १० कोटी २१ लाख २५ हजार ३०२ रुपये संबंधीत ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. याच कालावधीतील ऊस तोडणी वाहतूक पेमेंट १ कोटी २७ लाख ४० हजार रुपये संबंधीतांच्या बँक खात्यावर आजच जमा करण्यात येत असल्याचे श्रीरामचे कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर आणि श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी कळविले आहे.
    दरम्यान प्रारंभी कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यात आलेल्या अडचणी दूर करुन आता ३३०० ते ३५०० मे. टन गाळप करण्यात येत असून आतापर्यंत ७८ हजार २५८ मे. टन गाळप झाल्याचे मानसिंग पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
     तालुक्यातील श्रीरामकडे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यात येणार असून यावर्षी ५ लाख मे. गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल याची ग्वाही मानसिंग पाटील व सी. डी. तळेकर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad