३७ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग.!!
लोणी-धामणी: दिः०८/११/२०२१. लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री.भैरवनाथ विद्या द्याम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिपावलीचे औचित्य साधून १९८४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता.
यावेळी गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड,माजी प्राचार्य स.ल. शिंदे,प्राचार्य अरुण साकोरे,बाबाराजे वाळूंज व १९८४ च्या बॅचचे विद्यार्थी राज्यकर उपआयुक्त अरिप मुलाणी,पीडीसी बॅकेचे चीफ ऑफीसर विष्णू गायकवाड,पीएसआय राजाराम पवळे व राजाराम पोपळगट,मुखाध्यापक कांतीलाल दंडवते,शामा पारेख,सुमन वाळुंज,विठठल सुक्रे,दौलत गुळवे,मोहन सिनलकर,बाळासाहेब आदक,एकनाथ शिंदे,सुरेश खंडागळे,प्रकाश राजगुडे,ज्ञानेश्वर आदक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती व आपल्या जीवनाचे अनुभव सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देताना मात्र माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पानविल्या होत्या.यावेळी १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांनी बांधकाम चालू असलेल्या इमारतीसाठी ७५०००/ रुपयाची देणगी दिली.तर याच विद्यालयातील सेवानिवृत शिक्षक दादाभाऊ गावडे यांनी २५०००/ रुपयांची देणगी दिली.शेवटी गोड जेवणाचा अस्वाद घेऊन पुन्हा एखदा एकमेकांना भेटण्याचे पक्के ठरून निरोप घेतला. _________________________
: लोणी (ता.आंबेगाव) येथे १९८४ चे उपस्थित असलेले माजी विद्यार्थी.सोबत माजी प्राचार्य स.ल. शिंदे व मान्यवर. ________________________