Type Here to Get Search Results !

युवकांकडून शिक्षणाचा दिवा पेटवून दिवाळी साजरी, विविध पाड्यांवरून शिक्षणासाठी वन वन करीत अनवाणी पायांनी येणाऱ्या विद्यार्थाना शैक्षणिक साहित्यांसह सॅंडलचे वाटप

युवकांकडून शिक्षणाचा दिवा पेटवून दिवाळी साजरी, विविध पाड्यांवरून शिक्षणासाठी वन वन करीत अनवाणी पायांनी येणाऱ्या विद्यार्थाना शैक्षणिक साहित्यांसह सॅंडलचे वाटप 


अंबरनाथ च्या द युवा युनिटी फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. 
द युवा युनिटी फाऊंडेशन हि संस्था प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी युवकांची संस्था आहे. गरीब व गरजू मुलांचे शिक्षण, प्रौढ शिक्षण, महिलांना स्वयंभू बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण, महिलांची शाळा, संगणक प्रशिक्षण, तृतीय पंथींचे शिक्षण अश्या विविध विषयांवर काम करते. दरवर्षी संस्थेच्या वतीने दिवाळी निम्मित आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, तसेच शिक्षणासाठी त्यांना एक छोटीशी मदत म्हणून शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप केले जाते. या किट मध्ये प्रामुख्याने बॅग, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स, वह्या, पेन, कलर,कंपास पेटी, पेन, सॅंडल, मिठाई, इ चा समावेश असतो. या किट साठी दरवर्षी दिवाळी च्या एक आठवडा आधी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचे आवाहन केले जाते आणि लोकांकडून देणगी गोळा केली जाते. 
या वेळी सुद्धा दिवाळी च्या एक आठवडा अगोदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. योगेश चलवादी यांनी आवाहान केले असता अवघ्या काही दिवसातच ५१ मुलांना किट देता येईल एवढी देणगी जमा झाली. दि. ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी म्हसा रोड वरील लव्हाळी गावातील शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी विविध आदिवासी पाड्यांवरून अनवाणी पायांनी उन्हात वन वन करून शिक्षण घेण्यासाठी पायपीट करून येणाऱ्या ५१ मुलांना शैक्षणिक किट चे वाटप करण्यात आले." तुम्ही आज जे शैक्षणिक साहित्य मुलांना दिले त्याची खरंच या मुलांना गरज होती, मी आमच्या शाळेच्या वतीने द युवा युनिटी फाऊंडेशन चे आभार मानते
 ... सौ. सायली रमेश बुटेरे मॅडम " असे त्यांनी सांगितले. " मी सुद्धा मला लोकांनी दिलेल्या जुन्या बॅग्स घेऊन शाळेत जायचो. मला सुद्धा माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या, माझ्या शाळेच्या शिक्षिका सुरेखा पाटील मॅडम यांनी मला मदत केली अन मी पदवीधर झालो. आपणास पण कितीही जरी अडचणी आल्या तरी शिक्षण सोडू नका, काहीही मदत लागल्यास द युवा युनिटी फाऊंडेशन ला संपर्क करा असे योगेश यांनी सांगितले, तसेच जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना देणगी साठी आवाहन करतो तेव्हा तेव्हा लोक आमच्या कामाकडे पाहून आम्हाला भरभरून देणगी देतात त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आम्हा युवकांवर आपले आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या असेही योगेश म्हणाले " या कार्यक्रमासाठी संस्थेचे सागर माने, सुमन केवट, आदित्य नीलकंठ, अंकिता ठोकळ, सिद्धेश माईन, लक्ष्मी चलवादी, ओमकार माने, ओमकार नादिल्ला,नूर शेख, कंकतारा रामगिरी, सिंधू प्रजापती, मेहविश, आफरीन, पूजा, पुनीता, रोहित, साहिल,वेदिका कोळेकर, अमित, अमान विशवकर्मा, इ स्वयंसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad