लोणी येथे श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पडले पार.
दिः०७/११/२०२१. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी,खडकवाडी,शिरदाळे,पहाडदरा, वडगावपीर,मांदळेवाडी,रानमळा आदी गावांना डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी मिळावे या साठी श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने लोणी (ता.आंबेगाव ) येथे रविवार (दिः०७) रोजी शंभू महादेवाच्या मंदीरा समोर कृती समितिच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी धामणी,खडकवाडी,शिरदाळे,पहाडदरा, वडगावपीर,मांदळेवाडी,रानमळा परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कृती समितीचे समन्वयक सरपंच सागर जाधव,किरण वाळूंज,बाळाशिरम वाळूंज,गणेश तांबे,बाळासाहेब वाघ,संजय पोखरकर,अनिल डोके,संतोष पडवळ,भिमराव वाघ,सतिश थोरात व वरील सर्व गावचे सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी उपास्थित होते.आता जोपर्यंत पाणी मिळत नाही.तो पर्यंत आता माघार नाही.हि फक्त सुरुवात आहे.वेळ प्रसंगी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिंभे धरणात जलसमाधि घेण्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. _________________________
: लोणी (ता.आंबेगाव ) येथे श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
________________________