Type Here to Get Search Results !

शेतक-यांना रस्ता खुला करुन द्यावा : शेतक-यांसह शिवसेनेची मागणी फलटण

*तहसीलदारांनी सुरवडीतील शेतक-यांना रस्ता खुला करुन द्यावा : शेतक-यांसह फलटण तालुका शिवसेनेची मागणी*
फलटण तालुक्यातील सुरवडी व निंभोरे गावांच्या शिवेवरचा अंदाजे जवळपास तीन किमीचा रस्ता असुन यापैकी अंदाजे तीनशे फुटाचा रस्ता एका शेतक-याने अडवला असल्याची तक्रार सुरवडी येथील कोकरे वस्ती व जाधव वस्तीवरील शेतक-यांची आहे. पुर्वीच्या काळापासून दोन्ही बाजुच्या शेतक-यांनी सर्व शेतक-यांच्या सोयी सुविधा लक्षात घेऊन आपापल्या जागा या रस्त्यासाठी सोडलेल्या आहेत. तसेच या रस्त्याशिवाय इतर कोणताही रस्ता अस्तित्वात नाही. त्यामुळे सदर अडवलेला रस्ता खुला करुन द्यावा अशी शेतक-यांची मागणी असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी स्थानिक शेतक-यांसह फलटण तहसीलदार समीर यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

कोकरे वस्ती व जाधव वस्तीवरील लहान थोर अशी अंदाजे एकुण 200 लोकांची वस्ती असुन अंदाजे 100 च्या आसपास जनावरे आहेत. रस्ता बंद झाल्यामुळे जनावरांच्या चा-याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच शेती करण्यासाठी व शेतमाल वाहतुकीसाठी समस्या निर्माण होऊन येथील शेतक-यांचा शेती व्यवसाय व एकंदरीत जनजीवन धोक्यात आले असल्याचे शेतक-यांचे म्हणणे तहसीलदार समीर यादव यांची तहसीलदार दालनात भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

तात्काळ याठिकाणचा रस्ता शेती कामासाठी व शेत माल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवसैनिक येथील शेतक-यांसह तीव्र आंदोलन हाती घेतील व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासनाची असेल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असा गंभीर इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. फलटण तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, विभाग प्रमुख किसन यादव, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, सुरवडी शाखाप्रमुख हेमंत वाघ व दत्तात्रय मदने, तानाजी पवार, नंदकुमार कोकरे, धोंडीराम कोकरे, दत्तात्रय कोकरे, किसन कोकरे, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जाधव, मनोज जाधव, गजानन पवार, महादेव कोकरे, मयूर निंबाळकर, मयूर भोसले, प्रकाश कोकरे, नीलेश कोकरे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर एकुण 70 शेतकरी ग्रामस्थांनी सह्या केलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad