Type Here to Get Search Results !

सुरवडी रस्त्याचे काम पुर्ण करा; अन्यथा शिवसेनेचा ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा

*सुरवडी रस्त्याचे काम पुर्ण करा; अन्यथा शिवसेनेचा ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख*
सुरवडी, ता.फलटण गावातील कोकरे वस्ती व जाधव वस्ती येथील जवळुन गेलेल्या लोणंद-फलटण रेल्वे मार्गाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. परंतु कोकरे वस्ती व जाधव वस्ती येथील रेल्वेच्या ब्रीज नंबर 18 समोर मोठ्या पाईप टाकुन उत्तराने येणा-या पाण्याचा प्रवाह त्यातुन वाहुन जाईल व वरुन वाहतुकीसाठी रस्ता अबाधित राहिल असे योग्य नियोजन रेल्वे खाते व ठेकेदाराने केले होते. परंतु रेल्वे खाते व ठेकेदार यांनी योग्य समन्वय न घालता त्यांच्या अकार्यक्षम व निष्काळजीपणामुळे नियोजन केल्याप्रमाणे काम न होता त्याठिकाणी अंदाजे 50 फुट लांब, 15 फुट रुंद व 10 फुट खोल असा खड्डा झाल्याने तीन महिन्यांपासुन तेथील ग्रामस्थांची वाहतुकीमुळे सर्वच प्रकारे खुप मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यात तर त्या खड्ड्यात पाणी साठून त्याचा रस्त्यातच तलाव होत आहे. त्यावेळी लोकांना ब्रीजवरुन दोन चाकी गाड्यांची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे फलटण तालुका शिवसेना रेल्वे प्रशासन अधिकारी व ठेकेदार यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय योग्य विचार विनीमय करुन करणार असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्पष्ट सांगितले आहे. 

सदर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने ऊस तोडीला आलेल्या कामगारांच्या टोळ्या रस्त्याअभावी माघारी फिरत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त करुन जवळपास 200 एकर ऊस त्या भागात असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाल्यास याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासन व रेल्वे खात्याची असेल असेही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

तसेच सदर प्रलंबित काम आठ दिवसात पुर्ण न झाल्यास सुरवडी येथील शेकडो नागरिकांसह फलटण तालुका शिवसेना लोणंद-फलटण चौपदरीकरणावर सुरवडी येथे लोकशाही मार्गाने तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. आंदोलनवेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासन व रेल्वे खात्याची असेल असे लेखी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, विभाग प्रमुख किसन यादव, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, सुरवडी शाखाप्रमुख हेमंत वाघ व दत्तात्रय मदने, तानाजी पवार, नंदकुमार कोकरे, धोंडीराम कोकरे, दत्तात्रय कोकरे, किसन कोकरे, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जाधव, मनोज जाधव, गजानन पवार, महादेव कोकरे, मयूर निंबाळकर, मयूर भोसले, प्रकाश कोकरे, नीलेश कोकरे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर एकुण 70 ग्रामस्थांनी सह्या केलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad