पंढरीत सोलापूर गुन्हे शाखेने केली अवैध दारू विक्री वर कारवाई
देशी विदेशी दारूच्या 26 हजार 963 रुपये किमतीच्या बाटल्या केल्या हस्तगत
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूर:- पंढरपूर शहरात कार्तिकी यात्रा प्रबोधनी एकादशी चा सोहळा सुरू असतानाच एकादशीच्या पूर्वसंध्येला इंद्रप्रस्थ येथील हाॅटेल रंगोली च्या पाठीमागील बाजूस अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करत असताना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई.
याबाबत अधिक माहिती अशी सोलापूर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंढरपूर शहरातील इंद्रप्रस्थ येथील हॉटेल रंगोली च्या पाठीमागील बाजूस अवैधरित्या देशी विदेशी दारू च्या बाटल्यांची विक्री होत असल्याची खबर मिळाली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले असता त्या ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले यावेळी विक्री करणाऱ्या कपडे प्लास्टिक पोत्याच्या चार-पाच पिशव्या व दोन पोते मिळून आले त्यामध्ये देशी-विदेशी विवेक कंपनीचे ब्रँड असलेल्या दारुच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करीत होते या दारूच्या बाटल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत 26 हजार 963 रुपये आहे. यामध्ये आरोपी प्रताप वसंतसिंग ठाकूर (वय 40) राहणार रंगोली हॉटेल च्या मागे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 706/21 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली.