फलटण प्रतिनिधी विकास बेलदार,
आजारी असूनही त्यांनी जिल्हा बँकेच्या satara dcc bank निवडणुकीच्या सर्व हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवत तब्बल ११ जागा बिनविरोध केल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून लवकरच ते जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय होणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः सभापती रामराजेंनी व्हॉटस्ॲप स्टेटसव्दारे दिली आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीदरम्यानच, अचानक आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रूग्णालयात असूनही त्यांनी तेथूनच सुत्रे हालवत जिल्हा बँकेची राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी अंतिम केली होती. तसेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी व्हॉटस्ॲप व्हिडीओ कॉलव्दारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेऊन उमेदवारांची यादी अंतिम करत सहकार पॅनेलची घोषणा केली होती.आजारी असूनही त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या सर्व हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवत तब्बल ११ जागा बिनविरोध केल्या. यामध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना सामावून घेऊन त्यांना बिनविरोध निवडून देखील आणले. त्यासोबतच साताऱ्याचे सर्व राजे बिनविरोध केले होते.
गेल्या आठवडाभरापासूनच्या उपचारानंतर त्यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी आपल्या व्हॉटस्ॲप स्टेटसव्दारे ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी दवाखान्यातून घरी आलो आहे. लवकरच आपल्या सेवेला हजर होणार आहे, असेही त्यांनी व्हॉटस्ॲप स्टेटमध्ये दिलेल्या संदेशात म्हटले आहे.