फलटण पंचायत समितीचे सभापती तथा विद्यमान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व उपसभापती सौ . रेखा खरात यांनी आपल्या पदाची राजीनामे दिले आहेत .
आता नव्याने फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे ना . निंबाळकर यांचीच निवड होणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यामध्ये जोरदार रंगली आहे .
श्रीमंत शिवरुराजे खर्डेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सुपूर्त केला आहे . तर उपसभापती सौ . रेखा खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे दिला आहे . लवकरच या दोघांचेही राजीनामे मंजूर होतील यानंतर नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल . महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा . ना . श्रीमंत रामराजे ना . निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना . निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना . निंबाळकर हेच नव्याने फलटण पंचायत समितीचे सभापती , उपसभापती कोण होणार हे ठरविणार आहेत . मात्र सध्यातरी फलटण तालुक्यातील युवकांची पसंती श्रीमंत विश्वजीतराजे ना . निंबाळकर यांचे नावाला असल्याचे चित्र संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये आहे . तर उपसभापती पदासाठी अनेक जण इच्छुक असून मागील वेळेस बाळासाहेब ठोंबरे यौली उपसभापती पदासाठी आग्रही मागणी केल होती . यावेळी त्यांचा विचार होणार की नव्याने संजय सोडमिसे, संजय का इतर कोण उपसभापती होणार हे लवकरच निच्छित होणार.