फलटण प्रतिनिधी,
भारत देशाचा, स्वातंत्र्य सैनिकांचा व संपूर्ण भारतीयांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या भाजपरत्न कंगनाबाईचा शिवसेना फलटण तालुक्याच्यावतीने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, प्रभारी तालुका प्रमुख विकास नाळे व शिवसेना फलटण शहर प्रमुख रणजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारून शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच फलटण शहर पोलिस स्टेशन येथे विक्षिप्त व कृतघ्न अभिनेत्री कंगना रानावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, प्रभारी तालुका प्रमुख विकास नाळे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शिवसेना शहरप्रमुख रणजित कदम, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख विश्वासराव चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विकास राऊत, माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी तानाजी वाघ, उपतालुका प्रमुख नानासाहेब भोईटे, उपतालुका प्रमुख शिवाजी कोठावळे, विभाग प्रमुख किसन यादव, विभाग प्रमुख महेंद्र घाडगे, उपशहर प्रमुख राहुल पवार, शिवसेना उपविभाग प्रमुख विकास काटकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहर प्रमुख भारत लोहाना, सुरवडी शाखाप्रमुख दत्तात्रय मदने, तानाजी पवार, राजपुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते