*महात्मा फुले नगर झोपडपट्टीत 'आधार' कॅम्पला प्रतिसाद*
महात्मा फुले नगर भोसरी, मा. नगरसेवक जितेंद्रभाऊ ननावरे साहेब, आयोजित आणि RICHS आणि हक्कदर्शक
कंपनीच्या वतीने दि.21/22 आधार कॅम्प घेण्यात आला.135 लोकांनी या आधार कार्ड कॅम्पमध्ये आपली आधार कार्ड अपडेट करून घेतली. सोबत इतर योजना ज्यांना ज्यांना लागू पडत आहेत त्यांनाही त्या-त्या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्यात आले.
फुले नगर झोपडपट्टी या भागातील अनेक लोकांना सरकारी कागदपत्रे आणि त्या कागदपत्रांवर आधारित विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी हे शिबिर भरवण्यात आले होते. फुले नगर झोपडपट्टीतील लोकांना या योजनांचा माहितीअभावी आणि कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी हे शिबिर घेतले होते. यावेळी मा.जितेंद्र ननावरे नगरसेवक साहेब,भारतीय डाक विभाग चे मा.बांन्डे सर, उषा मेंन्डे मॅडम, उमेश पवार, *हक्कदर्शकचे प्रकल्प अधिकारी संदिप कांबळे, अमोल, सावंत गायकवाड़, गणेश, अलीबाबा, हेमंत,राजु खंडागले,रूपेश वाघमारे, उपस्थित होते.