पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट केलं. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्यानं आढावा घेण्यात यावा.
ग्रामीण भागात राबवण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधिक गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जिल्ह्यानं कोविड लसीकरणामध्ये ५५ लाखांचा टप्पा पार केला, ही समाधानाची बाब आहे. एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरणही जिल्ह्यानं पूर्ण केलं आहे. मात्र लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्यानं लसीकरणाला गती देता येत नाही. लस उपलब्धतेसाठी सातत्यानं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्यानं प्रयत्न आहे.