Type Here to Get Search Results !

पुण्यातील हायटेक कंपनी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागानं तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूत'चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डीवाइस ‘एएफ-१००’ व ‘एएफ-६०’ या मशिनचे आज लोकार्पण करण्यात आले

पुण्यातील हायटेक कंपनी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागानं तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूत'चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डीवाइस ‘एएफ-१००’ व ‘एएफ-६०’ या मशिनचे आज लोकार्पण करण्यात आले. 
मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट हा प्राणवायुदुत २५० एल. पी. एम. (लिटर प्रति मिनिट) क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील २० ते ५० बेडच्या हॉस्पिटलची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून, हा ३० मिनिटांच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. 
अत्याधुनिक स्थान/जी. पी. एस. ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय. ओ. टी.) मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ठरतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या साहाय्यानं ३० ते ५० किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपत्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणं सहज शक्य होणार आहे.
 प्राणवायुदुतमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलिंडर्स भरण्यासाठीही वापरता येतो. नगरसेविका नंदा लोणकर यांच्यातर्फे कोविड हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad