संजीव कनोजीया यांना रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने तर्फे कोरोणा योद्धा पुरस्कार
यस बी आय क्रेडिट कार्डचे पुण्याचे रिलेशशिप मॅनेजर संजीव कनोजीया यांच्या करोना काळातील कामाची दखल रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने घेऊन संजीव कोनोजीया यांना करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,
संपूर्ण जगा मध्ये करोना चा प्रादुर्भाव असताना देखील खूप लोक आपले कर्तव्य पार पाडत आहेत , पोलीस , डॉकटर, नर्स , अत्यावशक सेवेतील सर्व जण पण त्याच प्रमाणे बँक चे लोक देखील आपला जीव धोक्यात घालून जनतेला सेवा देण्याचे काम करत आहेत , याच गोष्टी ची दखल आज रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटने घेत संजीव कनोजीया यांचा करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला , या वेळेस रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख गणेश भालेराव , यस बी आय क्रेडिट कार्ड चे एरिया सेल्स मॅनेजर विकास कुमार व बाकी स्टाफ उपस्थित होते . . .