रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात कृषी दिन पुरस्कार सोहळा संपन्न
हरित क्रांतीचे प्रणेते माझी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती श्रीवर्धन येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी श्री. बाबुराव चोरगे साहेब सभापती पंचायत समिती श्रीवर्धन यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेले श्री हरिचंद्र मळेकर आणि
श्री रमन चिमन यांचा सत्कार करण्यात आला बळीराजांना रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी श्रीम. प्रगती आदवडे मॅडम जि. प. सदस्या, श्री. मंगेश कोमनाक साहेब पंचायत समिती सदस्य, श्रीम. गाणेकर मॅडम पंचायत समिती सदस्या, श्री. होळकर साहेब गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी, दिनेश पाटील रायगड