Type Here to Get Search Results !

१४०० कुटूंबियांना मदतीचा हात - राईज एन शाईन कंपनीचा उपक्रम

                                  १४०० कुटूंबियांना मदतीचा हात - राईज एन शाईन कंपनीचा उपक्रम


थेऊर, पुणे, - कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्वदूर परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. लॉकडाउनमुळे सामान्य कुटूंबाची परवड होत आहे. त्यांना आर्थिक चणचण भासत असून त्यात रोजगार बंद 


असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. औद्योगिक क्षेत्रात शुकशुकाट जाणवतोय बहुतांशी कंपन्या बंद  तसेच काही ठिकाणी मोजक्याच कामगारांद्वारे काम सुरु आहे.  काम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कंपनी आणि कामगार यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. दोन्ही धास्तवलेल्या परिस्थितीला तोंड देत आहेत. 
अश्या या परिस्थितीचा सामना करणाऱ्या थेऊर येथील गावठाण, वाड्या,  वस्त्या मधील गरजू कुटुंबियांना मदतीचा हात देत, टिश्यू कल्चर क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य कंपनी राईज एन शाईन बायोटेक बायोटेक प्रा. लि.  ही कंपनी गोर गरीब व हातावर पोट भरणाऱ्या गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कंपनीने खारीचा वाटा उचलत सुमारे १४०० कुटूंबियांना कोरोनाच्या हाहाकारात माणुसकीचा हात दिला आहे. त्याना आवश्यक अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.   यावेळी कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे अन्न धान्य किट कुटूंबातील प्रमुखाना देण्यात आले आहे.  गरजूना  एक महिना पुरेल इतके तांदूळ, तेल, डाळी किराणा साहित्य इ वाटप करून गरजूंना दिलासा दिला  आहे.  सोशल डिस्टेन्सिग, मास्क, सॅनिटायझर चा वापर करीत सुरक्षा व खबरदारी घेत नागरिकांनी अन्न धान्य स्वीकारले  व राईज अँड शाईन कंपनीचे लाभार्थ्यांनी आभार मानले तसेच या  कंपनीतील कामगारांना ही अन्न धान्य किट चे वाटप केले होते.
"राईज एन शाईन बायोटेक कंपनी माध्यामधून हे सामाजिक उपक्रम सतत राबविले जातात आपण एक दुसऱ्याला कायमच मदतीचा हात दिला पाहिजे गरजवंतांना, उपेक्षित घटकांना मदतीसाठी इतरांनी सुद्धा प्रोत्साहन द्यावे" असे डॉ.  भाग्यश्रीताई पाटील यांनी यावेळी ही भावना व्यक्त केली.  
या वेळी राईज एन शाईन बायोटेक  कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील तसेच  डॉ रोहिणी सोमनाथ पाटील व सौ यशश्री यशराज पाटील आणि कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News