Type Here to Get Search Results !

टॉयकॅथॉन-२०२१ ग्रँड फिनालेचे डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे येथे आयोजन

टॉयकॅथॉन-२०२१ ग्रँड फिनालेचे डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे येथे आयोजन


डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे  आणि शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल, नवी दिल्ली (एमआयसी) तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने टॉयकॅथॉन ग्रँड फिनालेच्या उद्घाटनाचा समारंभ आज दिनांक २२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


सुरवातीस टॉयकॅथॉन हे खेळणी आधारित  फिजिकल टॉयकॅथॉन आणि संगणकीय खेळांवर  आधारित डिजिटल टॉयकॅथॉन या दोन स्वरुपात प्रस्थावित केले होते. सध्याच्या कोविड 19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि सहभागींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक २२ जून २०२१ ते २४ जून २०२१ या काळात डिजिटल हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येत आहे
सदर स्पर्धेसाठी डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे या महाविद्यालयाची एमआयसी व  एआयसीटीई यांनी टॉयकॅथॉन-२०२१, ग्रँड फिनाले आयोजनासाठी निवड केली आहे. 


देशी खेळणी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या विविध भागांतील निवडक १५६७ संघांनी ८५ नोडल सेंटरच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे सहभाग नोंदवला आहे.
टॉय उद्योगात माननीय पंतप्रधान मोदींच्या “व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेवर जोर देताना शिक्षण मंत्रालयाने इतर मंत्रालयासोबत  मल्टी ट्रॅक देश-व्यापी टॉयकॅथॉनची संकल्पना मांडली. शिक्षण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय (एमडब्ल्यूसीडी), माहिती व प्रसारण मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि मंत्रालय वस्त्रोद्योग ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मधील शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल यांनी  संयुक्तपणे टॉयकॅथन 2021 आयोजित केले आहे.
सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त श्री. राजेश पाटील मुख्य अतिथी, तसेच डॉ.डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ.सोमनाथ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रमोद पाटील व महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या अधिष्ठाता व कार्यक्रमाच्या समन्वयक, डॉ. भावना अंबुडकर  आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. भावना अंबुडकर यांनी या कार्यक्रमा साठी देशातील निवडल्या गेलेल्या ८० संस्थांपैकी डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे  या संस्थेला सन २०१९-२० साठी संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालायाचे ५ स्टार नामांकन असल्यामुळेच या वर्षी टॉयकॅथॉन-२०२१ साठीचे समन्वय केंद्र म्हणून बहुमान मिळाल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रमोद पाटील यांनी महाविद्यालय विविध क्षेत्रात करत असलेल्या प्रगती बद्दल प्रमुख पाहुणे व उपस्थितांना माहिती दिली व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या श्रमांची प्रशंसा  केली आणि स्पर्धकांचे उतुंग कामासाठी अभिनंदन केले.
श्री. राजेश पाटील, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांनी त्यांच्या भाषणामध्ये महाविद्यालय करत असलेल्या कामाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन भारतातील होतकरू तरुण व विद्यार्थी यांना ही  उद्योजगते संदर्भातील उत्कृष्ठ संधी असल्याचे स्पष्ट केले. आपण भारतीय म्हणून नासा संस्थेसारखे  विश्वसनिय वातावरण निर्माण करून तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे. “टॉयकॅथॉन-२०२१”  ही तरुणांच्या मनातील संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची एक योग्य संधी आहे. 
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील म्हणाले की अशा कार्यक्रमाचे आयोजन करून महाविद्यालय, केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” अभियानाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावत असल्याचे प्रतिपादन केले. 

संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील यांचे विद्यार्थी व शिक्षकांना स्वयं रोजगार निर्मिती संदर्भातील बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे संस्थेची होत असलेली प्रगती व संकल्पित उपक्रम समाजासाठी निश्चित उपयोगी ठरतील. गतवर्षी संस्थेला मिळालेला सन २०१९-२० साठी संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालायाचे ५ स्टार नामांकन पुरस्कार देखील हेच अधोरेखित करतो. या कार्यक्रमाची सांगता डॉ. भावना अंबुडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून केली. 


Prof.Dr.Pramod Patil
 Principal and Professor
Department of Computer Engineering
Dr D.Y.Patil Institute of Technology, Pimpri, Pune-411018
College Website  :  www.engg.dypvp.edu.in
Office Email         :  principal.engg@dypvp.edu.in 
Office Phone 02027805298 ext. 7312                           
Mobile 9011456035

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News