Type Here to Get Search Results !

पालवी येथील मुलांना जीवनावश्यक वस्तू,धान्य वाटप करून उद्योजक आर के चव्हाण यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा

उद्योजक आर के चव्हाण यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा पालवी येथील मुलांना जीवनावश्यक वस्तू,धान्य वाटप


... तर, शंभर गरजवंतांना अन्नदानाचे वाटप करून वाढदिवस साजरा केला

पंढरपूर(प्रतिनिधी):- पुणे येथील उद्योजक आर के चव्हाण यांचा वाढदिवस हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला हार-तुरे, केक, पुष्पगुच्छ व वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत कोरोना काळामध्ये पंढरपूर येथे असलेले पालवी येथील मुला-मुलींना तसेच महिला व वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यासाठी उद्योजक आर के चव्हाण यांच्यावर मनोभावे प्रेम करणारे त्यांचे जवळचे अमजदभाई इनामदार रा. कासेगांव यांनी आपल्या स्वखर्चातून एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला व कोरोना कालावधीत पालवी येथील बालकांना मायेचा स्पर्श देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. पालवी हे एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांचे व महिलांचे घर संपूर्ण संगोपन प्रकल्प या ठिकाणी समाजातून दुरावलेले अनाथ बालकांचे संगोपन केलं जातं या ठिकाणी सध्या 150 मुले, मुली,महिला व वृद्ध आहेत. या संस्थेच्या संस्थापिका सौ मंगला शहा व सचिवा सौ डिंपल घाडगे यांनी संस्थेची माहिती सांगताना सांगितले की या ठिकाणी सध्या वनौषधी व उपयुक्त अशी रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोशाळा मुलांना शिक्षणासाठी शिक्षक वर्गही या ठिकाणी आहेत. या मुलांना मायेचा आधार म्हणून आज समाजातील विविध व्यक्ती हे आपले वाढदिवसाचा खर्च बाजूला ठेवून याठिकाणी मदतीच्या रूपाने त्यांना लागणाऱ्या वस्तू व सहकार्य करत असतात याच पद्धतीचे सहकार्य अमजद भाई इनामदार यांनी आपले आदरणीय असणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक आर के चव्हाण यांचा वाढदिवस येथील मुलांना जीवनावश्यक वस्तू देऊन साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत साईराज पाटील, संजय देविदास साठे, चिराग इनामदार, दिनेश राऊत, पत्रकार दिनेश खंडेलवाल हेही उपस्थित होते. या संस्थेत बांधकामासाठी लागणारी मदतही करण्यात आली पालवी च्या वतीने सचिवा डिंपल घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.
वाढदिवसाच्या इतर सर्व खर्चाला फाटा देत गरजू मुलांना जीवनावश्यक वस्तू, धान्य भेट करून व त्यांच्या सोबत त्यांना फळे, बिस्कीट पुडे देत साजरा करताना सर्वांनाच वेगळ्या अनुभवाची अनुभूती आली अशी प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली. दरम्यान सध्या कोरोना कालावधी मध्ये शहराच्या विविध भागात असलेल्या गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करण्याच्या विचार मनात येताच कासेगावचे अमजद भाई इनामदार यांनी रॉबिन हूड च्या माध्यमातून उद्योजक आर के चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंभर गरजू ,गरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News