*सोलापूर जिल्हा स्वाभिमानी* *शेतकरी संघटना*
*महावितरण कंपनीच्या सुलतानी* *वीजतोड* *कारवाईविरोधात रास्ता रोको* *आंदोलन*
प्रति
मा.अप्पर तहसीलदार सो
मंद्रुप ता.द.सोलापुर
महोदय
वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करणे , ट्रान्स्फर बंद करणे , संपूर्ण गावात एकच तास वीज देणे , वसुलीसाठी तगादा लावणे अशा विविध प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देऊन सक्तीची वीज बील वसुली सुरू आहे
शेतकरी लॅकडाऊन, अतिवृष्टी यामुळे अर्थिक अडचणीत आहेत त्यातच जिल्ह्य़ातील साखर कारखानदारांनी ऊसबिले दिलेली नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांना लगेच वीज बिल भरणे शक्य नाही
शेतकऱ्यांना राज्य सरकारने कृषी संजीवनी योजना आणुन वीज बिलात 33% सवलत व बिले भरण्यासाठी मार्च 2022 पर्यंतची मुदत दिलेली आहे तरीही महावितरणकडून शेतीपंपाची व घरगुती वीज तोडणी सुरु आहे
लॅकडाऊन च्या काळात सर्वाचे व्यवसाय उद्योग रोजगार बंद होते लॅकडाऊन नंतर महावितरणकडून अव्वाच्या सव्वा दराने घरगुती वीज बिल आल्यामुळेच सर्व सामान्यांना वीज भरणे शक्य नव्हते त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीजबिल माफ करावे
आपण शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीजकपात तात्काळ बंद करा व 3 महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करा व थकीत ऊसबिले तात्काळ जमा करण्याचे साखर कारखानदारांना आदेश द्या या मागणीसाठी आज 19 मार्च 2021रोजी मंद्रुप मोहोळ या ठिकाणी रस्तारोको केले आहे आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल
जिल्हाध्यक्ष : महामुद पटेल