साखर उद्योगाच्या विविध समस्यां, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे, हा उद्योग जगला तर शेतकरी व कर्मचाऱ्यांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल,
जे कारखाने बी हेवी मळीपासून इथेनॉल तयार करतात त्यांनाही मदत करणे गरजेचे आहे यासह विविध समस्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री Amit Shah जी यांची भेट घेतली.
यावेळी माजी मंत्री मा.पंकजाताई मुंडे, खासदार मा.श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मा.श्री.शिवेंद्रराजे भोसले,आमदार मा.श्री.रणजीतसिंह मोहिते पाटील,श्री.पृथ्वीराजबाबा देशमुख आदी उपस्थित होते.