वेल्ह्या तील घोमदांडवस्ती, टाकेवस्ती येथे महावितरण खात्याचा भोंगळ कारभार गेल्या 1 महिन्या पासून गाव आहे अंधारात
वेल्हे (पुणे) वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील घोमदांडवस्ती, टाकेवस्ती (धनगर वस्ती) गेल्या एक महिन्या पासून अंधारात असल्याने नागरिकांसह , जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पानशेत परिसरातील टेकपोळे ग्रुप ग्रामपंचायतिच्या हद्दीत घोमदांडवस्ती ,टाकेवस्ती पानशेत ते या वस्तीचे अंतर 46 किलोमीटर आहे, या वस्त्यांमध्ये दहा ते बारा घरे आहेत. या ठिकाणी चाळीस ते पन्नासा लोक राहातात या वस्ती वरील महावितरनचे विजेचे खांब पडले असून , गेल्या महिन्याभरा पासून या ठिकाणी वीज नसल्याने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, पिण्याच्या पाण्या साठी येथील महिलांना दोन ते तीन किलोमीटर पिण्याच्या पाण्या साठी उन्हात वन वन करावी लागत आहे , परंतु अजून देखील महावितरण विभाकडून या ठिकाणे कोणतीही हाल चाल केली गेली नाही , या वस्त्या अजून किती दिवस अश्याच अंधारात राहनार ? या कडे प्रशासन कधी लक्ष देणार ? किती दिवस या महिलांना अशीच पिण्याच्या पाण्या साठी उन्हात वन वन करावी लागणार ?