राज्यातील पहिले पर्यावरण पूरक प्रमाणपत्र प्राप्त
पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहास पर्यावरण पूरक प्रमाणपत्र प्राप्त करून राज्यात अग्रेसर ठरले

पिंपरी - डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे आज दि १० फेब्रुवारी २०२१ रोजी ब्युरो व्हेरिटास इंडिया या संस्थेने रुग्णालयातील (ऑपरेशन थिएटर) शस्त्रक्रियागृहास पर्यावरण पूरक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
ब्युरो व्हेरिटास, इंडिया यांनी केलेल्या सर्वेक्षणात रुग्णालयाला ९८.६ टक्के गुण प्राप्त करून प्लॅटिनम श्रेणी मिळाली. असे मानांकन मिळणारे हे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय आहे. करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने घेण्यात येणारी काळजी, संक्रमण नियंत्रण, विद्युत सुरक्षा, वीज बचत , आग नियंत्रण उपाययोजना, पर्यावरण पूरक उपकरणे, साधने, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रणाली, प्रदूषण नियंत्रण प्रणाली, सुरक्षित साहित्य व उपकरणाची हाताळणी, अत्यंत कुशल भूल तज्ञ्, शल्य चिकित्सक आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफआदीचे मूल्यमापन करून त्यांनी ठरवलेल्या निकषांवर हे गुण प्राप्त झाले रुग्णालयातील २१ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्सचा या मूल्यमापनात समावेश होता.
या समारंभा वेळी ॲबोट, इंडिया संस्थेचे विक्री व विपणन विभागप्रमुख कौशिक भट्टाचार्या व विभागीय व्यवसाय व्यवस्थापक चेतन खत्री यांनी डॉ. डी वाय. पाटील रुग्णालयाचे विश्वस्थ व कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शितल दीक्षित यांनी केले. ॲबोट, इंडिया संस्थेचे कौशिक भट्टाचार्या यांनी पर्यावरण पूरक ऑपरेशन थिएटर्सचा मूल्यमापनात केलेल्या निकषाबद्दल प्राप्त गुणाचा आढावा दिला.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जे एस भवाळकर यांनी मिळालेल्या यशाबद्दल परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कौतुक केले ते बोलताना म्हणाले “आमचे प्रेरणास्थान मा. कुलपती डॉ पी. डी. पाटील व उपकुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या दूरदृष्टीचे हे फळ आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज हे यश प्राप्त झाले”.
शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ वत्सलस्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ एच एच चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दाते, कॉर्पोरट विभागाचे संचालक डॉ पी एस गर्चा, उप संचालक डॉ.सी.एन. जयदीप व सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा चोरडिया तर आभार प्रदर्शन सोनाली बोदमवाड यांनी केले.
फोटोचा तपशील डाव्या बाजूने - सुनील दाते, डॉ शीतल दीक्षित, डॉ वत्सलस्वामी, डॉ.सी.एन.जयदीप, डॉ पी एस गर्चा, कौशिक भट्टाचार्या, डॉ यशराज पाटील, चेतन खत्री, डॉ जे एस भवाळकर, डॉ एच एच चव्हाण, डॉ शहाजी चव्हाण.