Type Here to Get Search Results !

राघूचीवाडीचे राजेंद्र करवार यांनी अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव करून दिली

माणुसकीचे दर्शन मंगळवार दिनांक 08.2.2021 


रोजी गावातील बूस्टर टाकी जवळ मोटार सायकल चा अपघात झाला.अपघात येवढा भयानक होता की  अपघातात मौजे झरेगाव ता. उस्मानाबाद येथील ,सचिन माने हे जागीच मृत्यू पावले होते, रात्रीची वेळ असल्याने त्यांचे जवळील रुमालात बांधून ठेवलेले 150,000 (एक लाख पन्नास हजार रुपये) रस्त्याचे बाजूस अंधारात पडलेले पैसे राजेंद्र(राजभाऊ) करवार यांना मिळाले , सदरील रक्कम राजेंद्र करवार यांनी नातेवाइकांची खात्री करून मृत व्यक्तीचे पत्नीस एक लाख पन्नास हजार रुपये ही रक्कम  त्यांच्या गावात जाऊन परत केली आहे. त्यावेळी झरेगाव येथील ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले व अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव झाली. खरचं आजच्या काळात अश्या लोकांची समाजाला गरज आहे..आज खरचं अशा लोकांचा अभिमान वाटतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad