काळू नदी झाली नावा प्रमाणे काळी...
नदी मध्ये सरळच भयंकर केमिकल रसायन...
आंबिवली स्टेशन च्या मागुन वाहणारी उल्हास नदी ची उपनदी काळू नदी ही नावा प्रमाणेच काळीकुट्ट झालेली दिसत आहे.
काळू नदी च्या काठी आंबिवली स्टेशन जवळ बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेड नावाची एक पेपर बनवणारी मोठी कंपनी आहे, कंपनी बाहेरच शेकडो टन पेपर चा मलबा पडून आहे, त्यातून मोठी दुर्गंधि पसरली आहे तर कंपनीतुन दररोज़ वाहणाऱ्या दूषित रासायनिक केमिकल पाणी हे कोणती ही प्रक्रिया न करता सरळच काळू नदी मध्ये जाऊन मिसळत आहे,
काळू नदी ही महाराष्ट्रा तील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या कळसुबाई वन्य जीव अभयारण्यात (प्रशासकीय दृष्टया अहमदनगर जिह्यात) पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा धरणाजवळ खिरेश्वर येथे टोलार खिंडीमध्ये होतो. हिला दोन उपनद्या आहेत सरळगाव संगम येथे डोईफोडी येऊन मिळते तर टिटवाळा आणि खडवलीच्यामध्ये भातसा नदीला घेऊन अंबिवली येथे उल्हास नदीस मिळते परंतु काळू नदी नावा प्रमाणेच काळीकुट्ट झाली असुन नदी मध्ये कंपनी तर्फे सरळच केमिकल रसायन सोडले जात आहे.