प्रभाग क्रमांक १९ मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
नेहरू नगर महिला मंडळा तर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका मिनाक्षी रवी पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमात सुमारे ३५० महिलांना हळदीकुंकू निमित्ताने भेटवस्तू देण्यात आलीय.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ च्या वतिने महिलांसाठी भव्य हळदिकुंकू कार्यक्रम पार पडला.
प्रभाग क्रमांक १९ नेहरु नगर उल्हासनगर ५ येथे नगरसेविका सौ.मिनाक्षी रवी पाटील.स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्या तर्फे भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला असून सुवासिनी महिलांना ओवाळून सौभाग्याच लेन वान देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नेहरू नगर महिला मंडळ,समाजसेवक रवी पाटील, युवानेते युवराज विजय पाटील, रमेश हजारे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.