Type Here to Get Search Results !

सभापती श्रीकांत धुमाळ जनतेच्या दारी !देवगाव गणातुन घरकुलांची पाहणी दौ-याला सुरुवात

सभापती श्रीकांत धुमाळ जनतेच्या दारी
!देवगाव गणातुन  घरकुलांची पाहणी दौ-याला सुरुवात

राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी 'मागासवर्गीय 'समाजाच्या उन्नतीसाठी अनेक विकासात्मक उपाययोजना राबविल्या जातात. त्याच अनुषंगाने  मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीतील वंचित घटकांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ मिळावा.

 यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  आजपासून मुरबाड तालुक्यात  "सभापती आपल्या दारी "या उपक्रमा अंतर्गत  मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी देवगाव पंचायत समिती गणापासुन घरकुल पाहणी दौ-याला  सुरुवात केली आहे.




              गरीब , गरजु नागरिकांना त्यांचे हक्क व न्याय मिळावा. तसेच समाजात विविध विकास योजनांबाबत आणि प्राधान्याने घरकुल योजनेची प्रभावी पणे जनजागृती व अंमलबजावणी  व्हावी  यासाठी आज देवगाव गणातील सर्व ग्रामपंचायतींचे संबधीत ग्रामसेवक ' व त्या त्या भागातील कार्यकर्ते सोबत घेवून 'सभापती श्रीकांत धुमाळ यांनी देवराळ वाडी ',सुकाळ वाडी ,'फणसोली 'कातकरी वाडी ', देवपे ,'लव्हाळी 'वाशिवली ,'संतवाडी ',शेळशेत, 'उंबरवेढे ',फणसवाडी, 'बिरवाडी, 'धानिवली ',ब्राम्हणगाव, 'शिर्के पाडा 'व देवगाव या गावाना प्रत्यक्षात भेटी देवुन कच्च्या घरांची पाहणी करून घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित घटकांनी तात्काळ आपले बँक खाते पुस्तक ' जातीचा दाखला 'आधार कार्ड 'अशी कागदपत्रे आपापल्या ग्रामसेवकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. "सभापती आपल्या दारी"   या अभियानांतर्गत संपूर्ण मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती -जमातीतील बांधवांना पक्की घरे देण्याचा मुरबाड पंचायत समितीचा संकल्प असल्याचे सभापती धुमाळ यांनी  इंडिया न्यूज नेटवर्क  चैनल शी  बोलताना सांगितले. आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad