शिर्डी साईबाबा संस्थानने एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी बातम्या केल्याने आकस मनात धरून उपकार्यकारी रवींद्र ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या आदेशानुसार ए.बि.पी.माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार नितीन ओझा आणी मुकुल कुलकर्णी यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची योग्य ती चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष हरीष दिमोटे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन पत्राद्वारे केली
दरम्यान सोमवार दि.1 फेब्रुवारी रोजी शिर्डी प्रेस क्लब तसेच पत्रकार संघाच्या वतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साईबाबा संस्थान उप मुख्य कार्यकारी अधिकारी यानी पत्रकारावर गुन्हा दाखल केला असून आम्ही शिर्डी प्रेस इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधि आपल्याला विनंती करतो की, साईबाबा संस्थान उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यानी àbp माझा या वृतवहिनींच्या प्रतिनिधि नितीन ओझा, मुकल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची आड घेवुंन खोटा गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्हा हा सूड काढण्याच्या उद्द्येशाने व खोटा दाखल केला असल्यान आपल्याकडे या निवेदनाच्या माध्यमातून न्याय मागत आहोत.सदरचा गुन्हा हा खोटा आहे.साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने भक्त गैरसोयीच्या बातम्या केल्याचा आकस मनात धरुन मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच बगाटे व उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यानी एक विचाराने खोटी फिर्याद सुमारे अडीच महिन्यानंतर दाखल केली आहे. विशेष म्हणजे आजमितीला साईबाबा संस्थान आपल्या अध्यक्षतेखाली काम करत असताना या के एच बगाटे व रविंद्र ठाकरे दोन महसुली अधिकारी यानी आपल्या अपरोक्ष ही बेकायदेशीर फिर्याद नोंदविली आहे.यातुन या अधिका-यानी न्यायालयीन अधिकारात हस्तक्षेप करुन आपले अधिकार प्रशस्त असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.हा संदेश लोकात रूजविण्याचा यांचा हा प्रयत्न आहे.याना काही राजकिय पाठिंबा असल्याने हे अधिकारी असे धारीष्ठ करीत असल्याचा संदेश बगाटे व ठाकरे यांच्या कृतीतून समाजात पसरवला जात आहे असे वाटते.
आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधि आपल्याला विनम्र विनंती करतो की या दोन्ही पुर्वग्रह व सूड बुद्धीने लोकसेवकाची भुमिका निभावणारे कान्हुराज बगाटे व रविंद्र ठाकरे यानी केलेल्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करुन कडक कारवाई करावी ही विनंती करीत आहोत. यासोबतच कान्हुराज बगाटे व रविंद्र ठाकरे यानी दखल केलेली खोटी फिर्याद मागे घेण्यासाठी आदेश देवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार सतिष वैजापुरकर, ,मनोज गाडेकर, प्रशांत शर्मा, सुनील दवंगे, राजकुमार जाधव, किशोर पाटणी, हेमंत शेजवळ, रवींद्र महाले, सचिन बनसोडे, किरण सोनवणे, मोबीन खान आदिसह पत्रकार बांधव उपस्थित होते.