म्हसा यात्रेवर 144 कलम लागू दहा दिवस दुकाने राहणार बंद
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या बहुतेक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक यात्रावर शासनाने बंदी घातली असून नुकताच येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रेवरही मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी नुकताच संचार बंदी नुसार 173 कलम अन्वये 144 धारा लागू करून म्हसा यात्रा यंदाच्या वर्षी बंद असल्याचे शासनाच्या आदेशानुसार परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार खांब लिंगेश्वर ट्रस्ट म्हसा यांनीच फक्त म्हसोबा देवस्थान खांब लिंगेश्वर देवाचे विधीवत पूजा करण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे
सदर यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्यांमधील विविध ठिकाणाहून भक्त भाविक म्हसोबा खांबलिंगेश्वरचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व लहान मुले यात्रेचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावर्षीची म्हसा यात्रा रद्द करण्यात आली आहे या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात बैलांची विक्री घोंगडी बाजार शेतकरी बांधवांनी बनवलेल्या बांबूच्या टोपल्या व विविध वस्तू तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ या यात्रेचे मुख्य आकर्षण असते लाखो करोडोंची उलाढाल होणाऱ्या यात्रेवर मात्र यंदा कोरोना सदृश्य परिस्थिती उद्भवल्याने म्हसा परिसरात वेगलच दृश्य पाहायला मिळत आहे अडीच हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या म्हसा यात्रेला यावर्षी 173 कलम अन्वये 144 धारा लागू झाल्याने म्हसा ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच दुकाने तसेच हॉटेल विविध स्टॉल्स बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे