*महाराष्ट्रांच्या पुत्रांचा भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांची जन्मभूमी असलेल्या सारण, छपरा, बिहार या ठिकाणी राष्ट्रीय प्रेरणा दूत अवॉर्ड 2021 ने सन्मान ...*
अंबरनाथ मधील द युवा युनिटी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कु.योगेश चलवादी तसेच संस्थेची समन्वयक कुमारी सुमन केवट यांना बिहार मधील फेस ऑफ फ्युचर इंडिया या सामाजिक संस्थे तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय प्रेरणा दूत अवॉर्ड २०२०-२०२१ ने सन्मानित करण्यात आले. सदर अवॉर्डसाठी महाराष्ट्र राज्यासोबतच मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,बिहार, उत्तराखंड, साऊथ सिकीम,जम्मू कश्मीर,पश्चिम बंगाल, उडिशा,झारखंड,गुजरात,हिमाचल प्रदेश या १२ राज्यांचा समावेश होता.
विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या १२ राज्यातील एकूण ३२ युवकांची निवड करण्यात आली होती. योगेश चलवादी व त्यांच्या संपूर्ण द युवा युनिटी फाऊंडेशन च्या सदस्यांच्या मदतीने अंबरनाथ च्या महेंद्रनगर परिसरात होतकरू मुलांना युवा ॲक्टिविटी सेंटर च्या माध्यमातून गरीब मुलांना शिक्षण,युवा मोहल्ला क्लिनिक च्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व औषधी केंद्र,युवा पुस्तकालय च्या माध्यमातून शहराची सेवा केली जाते. त्याचप्रमाणे योगेश यांना अंबरनाथ शहरात सफाई दादा म्हणून ओळखले जाते. गरजूंना मोफत जेवण वाटप, होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, ब्लँकेट वाटप,कपडे वाटप,आरोग्य शिबीर, ई काम योगेश चलवादी यांच्या नेतृत्वात संस्थे च्या युवकांनी काम केले आहे. तसेच लॉकडाऊन च्या काळात Food Ambulance च्या माध्यमातून लाखो लोकांना जेवण देऊन,हजारो लोकांना धान्य वाटप करण्यात आले,औषध - कपडे, दुध पावडर वाटप केले. भिवंडी बायपास,कल्याण स्टेशन या ठिकाणाहून निघणाऱ्या हजारो कामगारांना मास्क,जेवण,पाणी,बिस्कीट,चप्पल वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर ०६ महिने अंबरनाथ नगरपालिकेत covid -१९ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीम (सुपर ३०) चे प्रमुख म्हणून काम पाहिले व आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आता माहिती - शिक्षा - संपर्क प्रमुख म्हणून मोफत सेवा दिली जात आहे. योगेश चलवादी यांना या आधी नेपाल मध्ये special recognition Award 2020, तहसीलदार यांच्या माध्यमातून संस्थेला covid योध्दा व योगेश यांना उत्कृष्ट आरोग्य सहायक म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आले.याच बरोबर विविध 20 सामाजिक संस्थेने सुद्धा योगेश व त्यांच्या टीम ला सन्मानित केले आहे. आता पर्यंत जेवढे सन्मान मिळाले आहे हे माझे नसून माझ्या शहराचे,संस्थेच्या स्वयंसेवकांचे,शहराच्या युवकांचे आहे. योगेश आणि त्याच्या टीम ला नेहमी खुल्या मनाने मदत करणाऱ्या नागरिकांचे,देणगीदारांचे आहे. आज माझ्या सोबत संस्थेत समन्वयक म्हणून काम करणाऱ्या सुमन ला मिळालेले अवॉर्ड माझ्यासाठी खूप आनंदाची व मुलींसाठी प्रेरणादायक बाब आहे, असे योगेश यांनी सांगितले.