Type Here to Get Search Results !

विमानाने येणाऱ्या साईभक्ताची कोरोना तपासणी अहवाल तात्काळ द्यावा..जितेश लोकचंदाणी

विमानाने येणाऱ्या साईभक्ताची कोरोना तपासणी अहवाल तात्काळ द्यावा..जितेश लोकचंदाणी

आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेले शिर्डीचे साईबाबा मंदिर 

या साईबाबा मंदिरात हजारो साईभक्त नतमस्तक होताता 

परंतु या साईभक्तांची व शिर्डी ग्रामस्थांची सुरक्षा आता राम भरोसे?  


सल्ग 
 शिर्डी हे साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे देशातील कानाकोपर्‍यातून साईभक्त मोठ्या प्रमाणात येत आहेत,श्री साई मंदिर खुले झाल्यापासून येथे साईभक्त दर्शनासाठी येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतआहे,देशातील विमान सेवाही सुरू असल्यामुळे व शिर्डी विमानतळ सुरू झाल्यामुळे शिर्डीत दिल्ली,हैदराबाद,बंगलोर अदी ठिकाणाहून विमाने येत असतात, या विमानाने दररोज अनेक साईभक्त प्रवासीही शिर्डीत येत असतात,मात्र शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची कोरोनाची RTPCR तपासणी संगमनेर येथिल स्वामी कृपा क्लिनिक लेबोरेटरी या वैद्यकिय संस्थेमार्फत केली जाते, एका व्यक्तीला या कोरोणा तपासणीसाठी 980 रुपये आकारले जातात,प्रत्येकी 980 रुपये फी घेऊन कोरोना तपासणी करून मात्र तिचा अहवाल तत्काळ दिला जात नाही, त्यांचा अहवाल ते शिर्डीत आल्यानंतर 10 ते 12 तासांनी किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळेनंतर त्यांच्या मोबाईल वर मॅसेज द्वारे पाठवलं जातो,तसे पाहता त्यांना अहवाल येईपर्यंत विलगिकरण कक्षात ठेवले जात नाही,त्यांना शिर्डीकडे किंवा इतर ठिकाणी जाण्यास किंवा विमानतळाआतून बाहेर पडण्यास मुभा दिली जात आहे,त्यामुळे जर विमानातुन येणारा एखादा प्रवासी कोरोना बाधित असला तर त्यामुळे शिर्डीत ही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो,ब्रिटन मध्ये कोरोनाचा नवीन स्टेन आलेला असून त्याचे मुंबई व महाराष्ट्रात त्याचे रुग्ण सापडत आहेत,त्यामुळे असा कोरोना बाधित रुग्ण जर विमानाने शिर्डीत आला तर त्याचा प्रादुर्भाव शिर्डीत वाढू शकतो ,मात्र याचा विचार न करता शिर्डी विमानतळावर हि कोरोना तपासणी करणारी स्वामीकृपा कोरोना लॅबरोटरी प्रत्येकी 980 रुपये घेऊन तपासणी करुन अहवाल न देता अशा साईभक्तांना थेट विमानतळाबाहेर पडण्यास सवलत देतात,या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात शिर्डीला कोरोणा चा धोका निर्माण झाला असून या शिर्डी विमानतळावर ही कोरोना तपासणी करणार्‍या या स्वामी कृपा क्लिनिक लॅबोरेटरीने बाहेर शहरातून विमानातुन येणाऱ्या साई भक्त व प्रवाशांची रॅपिड टेस्ट करून त्यांना झटपट अहवाल देऊन विमानतळाबाहेर सोडण्यात यावे,जेणेकरून साईभक्तांचा वेळही जाणार नाही व कोरोणाची तपासणीही व्यवस्थित होईल,नाही तर शिर्डी पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ येऊन शक्ते?अशी मागणी साई भक्त व शिर्डी कर करत आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad