Type Here to Get Search Results !

कोरोना मागोमाग देशावर 'बर्ड फ्लू'चं संकट; 'या' राज्यांत सतर्कतेचा इशारा

करोनाशी मागील नऊ महिन्यांपासून लढा देणाऱ्या भारताला लसीच्या ड्राय रन सुरु झाल्याने थोडा दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा एकदा नव्या संकटाची चाहूल लागली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालच नंतर आता केरळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. केरळने बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.केरळचे वन्यजीव मंत्री के. राजू यांनी राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठ सॅम्पल्समध्ये विषाणू आढळल्याचे राजू यांनी म्हटलं आहे. बर्ड फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वच पोल्ट्री फार्म आणि पक्षी उत्पादकांच्या पोल्ट्री बाजारांवर, जलाशये तसेच प्रवासी पक्षांच्या निवाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचे विषाणू आढळून न आलेल्या जिल्ह्यांमध्येही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad