Type Here to Get Search Results !

काळाची गरज ओळखून वाहतुकी बाबद जनजागरण झाले पाहीजे

जीवन अमुल्य आहे. आपल्या बरोबर दुसर्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे..पोलिस निरिक्षक नारायण न्याहाळदे
 
काळाची गरज ओळखून वाहतुकी बाबद जनजागरण झाले पाहीजे.वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा,जीवन हे अमुल्य असुन आपल्या बरोबर दुसर्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन नव्यानेच रुजु झालेले पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी,शिर्डी  वाहतुक शाखेच्या वतीने साईनाथ विद्यालयात आयोजित केलेल्या पोलिस स्थापना दिन व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते,या वेळी,साईनाथ शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुलकर्णी,उपमुख्यध्यापिका सौ.बोऱ्हाडे,पर्यवेक्षीका अरणे मॅडम,नंदकुमार जाधवसर, वारुळेसर,यांचे मार्गदर्शन लाभले,शाला समितीचे को-चेअरमन मनोजभाऊ लोढा यांनी शुभेच्छा दिल्या,
पुढे बोलतांना न्याहाळदे म्हणाले की वाहनांचा वेग व संख्या वाढल्यामुळे आपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे वाहन चालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे,या प्रसंगी शिर्डी वाहतुक शाखाचे पोलिस नाईक सुर्यवंशी,पोलिस नाईक सुनिल चव्हाण,अमोल पालवे,उपस्थित होते.
 पुढे बोलतांना न्याहाळदे म्हणाले कि वाहन चालकांनी व्यासनांन पासुन दुर राहावे वाहन चालवितांना मोबाइलवर बोलणे चुकिचे आहे आपली घरी कोणी तरी वाट पहात आहे,याची काळजी वाहन चालकांनी घेतली पाहीजे,त्याच प्रमाणे वाहनांतील प्रवासी हे आपले एक कुटूंबच आहे असे समजुन योग्यती खबरदारी घेतली पाहीजे,
पुढे बोलतांना मुख्याध्यापक कुलकर्णी म्हणाले कि विद्यार्थींना जर कोणी त्रास देत असेल तर घाबरुन न आपल्या अध्यापक व अध्यापिका यांच्याशी संपर्क साधुन तक्रार करा,आपले नाव गुपित ठेवले जाईल,काही अडीअडचणी असेल तर नि- संकोच पणे आपले म्हणने मांडले पाहिजे,कार्यक्रमाची प्रस्तावना व परिचय गोर्डेसर यांनी केले तर सुत्रसंचालन सौ.दिघे यांनी केले तर आभार म्हस्के सर यांनी मानले,या वेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad