Type Here to Get Search Results !

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणुन अहोरात्र सेवा करत असुन पुढे हि अशीच सेवा करत राहाणार डाॅ. रविंद्र गायकवाड यांचे प्रतिपादन

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणुन अहोरात्र सेवा करत असुन पुढे हि अशीच सेवा करत राहाणार डाॅ. रविंद्र गायकवाड यांचे प्रतिपादन 
सल्ग 
स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणारे व  रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे डाॅ.रविंद्र गायकवाड यांचा आपल्या सेवेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने साईनाथ हाॅस्पिटलचे डाॅक्टर व कर्मचारी यांनी डाॅ. गायकवाड यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता.
साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले  फिजिशियन डॉ.रविंद्र गायकवाड यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात होता,या निरोप समारंभ प्रसंगी वैद्यकीय अधिक्षिका डाॅ.मैथिली पिताबंरे,डाॅ. पोरवाल,डाॅ.अशोक गावित्रे,डाॅ.सौ साबळे,शिवप्रकाश जाधव,राम निकम,सोळसे आदी डाॅक्टर,कर्मचारी उपस्थित होते,
एक वर्षाहुन अधिक फिजिशियन डॉ,गायकवाड यांनी साईबाबा संस्थांच्या साईनाथ हॉस्पिटलला अहोरात्र सेवा दिली,
 एका वर्षात निरोप समारंभ आणि एवढ्या उत्साहात करण्याचे कारणही तसे वैशिष्ट्य पुर्णच..गायकवाड डॉक्टरांची काम करण्याची पद्धत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणे तर रुग्णांशी एक अनोखा जिव्हाळा जपत जी सेवा दिली त्याची पावती म्हणून आज हॉस्पिटलच्या स्टाफने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता तर कोरोनाची कठीण काळात रुग्णसेवा अविरतपणे जपणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सर्वांनी यथोचित सन्मान करत निरोप दिलाय..यावेळी मनोगत व्यक्त करतांना अनेकांचे मन भरून आले होते,तर डाॅ. गायकवाड यांनी डाॅक्टर व कर्मचारी यांचे प्रेम पाहुन आठवड्यातील एक किंवा दोन दिवस देण्याचे जाहीर केले
विशेष प्रतिनिधी शिर्डी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad