Type Here to Get Search Results !

पुणे येथील पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे .

पुणे येथील पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील जी यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे . 

शरद पवार हे म्हणाले होते आरोप गंभीर आहेत . यासंदर्भातील विषयांवर पवार हे नेहमीच कडक धोरण स्वीकारतात .

पवार यांच्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाले त्यांना पवार यांनी कधीच पाठीशी घातले असे झाले नाही . 

पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने सर्वांचाच भ्रमनिरास झाला . धनंजय मुंडे यांनी संवेदनशीलपणा दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता , अन्यथा शरद पवार यांनी नैतिकतेच्या जबाबदारीने मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता . 

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी सुरु राहील , पण रेणू शर्मा यांनी केलेले आरोप गंभीर आहेत . यामुळे राजीनामा देण्याची मागणी केली होती.

यापूर्वीही १ ९ ८४ मध्ये रामराव आदिक यांच्याविरोधात हवाईसुंदरीची तक्रार , २०० ९ मध्ये एन.डी तिवारी यांनाही आक्षेपार्ह चित्रफीतीमुळे राज्यपाल पदाचा राजीनामा द्यायला लागला होता . 

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही , तर भाजपा महिला मोर्चा सोमवारपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे . 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad