अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं आणि..." उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला बंद केलेल्या पेट्रोल पंपाचा किस्सा.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तृत्वाचा एक चाहता वर्ग आहे. अजित पवार अनेकदा जुन्या गंमतीशीर प्रसंग वा घटना कार्यकर्त्यांना सांगतात... असे किस्से ऐकून कार्यक्रमात हास्याचे कारंजे उडतात. अशीच एक किस्सा अजित पवार यांनी खेडमधील चिंबळी येथे बोलताना सांगितला. निमित्त पेट्रोल पंपच्या उद्घाटनाचं. यावेळी अजित पवार यांनी पेट्रोल भेसळीची आठवणी सांगत स्वतः पेट्रोल पंप का बंद करावा लागला, याचा उलगडा केला.
चिंबळी येथे पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले,"साखर कारखान्यामार्फत पेट्रोल पंप चालतो. बारामतीमध्ये खरेदी विक्री, दूध संघ, मार्केट कमिटीकडून पेट्रोल पपं चालवले जातात. लोकांचा विश्वास खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ पेट्रोल पंपावर असतो, तिथे भेसळ होणार नाही. त्यामुळे तिथे ग्राहक जास्त असतात. आता भेसळीचे प्रमाण जवळपास संपलं आहे. लोणी काळभोर जिथे पेट्रोल, डिझेल भरलं जात तिथे नवीन टेक्नॉलॉजीनुसार काही गडबड तर होत नाही ना हे पाहिलं जातं. तरी देखील काही जण पेट्रोल सोडताना चिप बदलणं. त्यामुळे लिटर मागे थोडसं पेट्रोल कमी जाईल, अशी चोरी केली जाते. असलं फार काळ चालत नाहीत. एकदा का नागरिकांना समजलं की हा पेट्रोल पंप गडबड करतोय तो ओस पडला म्हणून समाजाच," असं अजित पवार म्हणाले.
स्वतःच्या पेट्रोलपंपाबद्दलचा किस्साही यावेळी पवारांनी सांगितला. "दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारच्या या काळामध्ये पेट्रोल शंभरी पार गेलं, तर आश्चर्य वाटू देऊ नका, एवढं झपाट्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. शेवटी वाहनं, तर घ्यावीच लागतात. १५ वर्षानंतर वाहन स्क्रॅबमध्ये जाणार आहे. आणखी तो एक नियम आला आहे. अन्यथा आपल्याकडे कितीतरी वर्ष वाहन वापरणारे नागरिक आहेत. असे वेगवेगळे नियम येत असतात. मगाशी आमदार दिलीपराव यांनी सांगितलं असं म्हणत अजित पवार म्हणाले, १९९१ साली खासदारकीला असताना माझा लोणीकंदला पेट्रोप पपं होता. त्या काळात पंपामध्ये भेसळीचे प्रमाण चालायचे. पेट्रोल पंपावर भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करायला लागला, असं व्हायचं आणि माझीच बदनामी व्हायची म्हणून तो पेट्रोल पंप बांदल नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला," असं अजित पवारांनी म्हणाले.