*चिरड ग्रामपंचायतीचा सौचालय चोरीला गेल्याने बिडिओची शोध मोहीम*
मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत चिरड गावातील सार्वजनिक शौचालय 2010 पासून चोरीला गेल्याची तक्रार आरपीआय पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बालाराम गायकवाड यांनी मुरबाडचे गटविकास अधिकारी रमेश अवचार व पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांच्याकडे केली असता तातडीने तक्रारीची दखल घेत बीडिओ अवचार व सभापती श्रीकांत धुमाल हे जागेवर येऊन चोरी गेलेले शौचालय शोधण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून लवकरात लवकर हे शौचालय शोधण्याचे आदेश प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहेत सदर गावाला तंटामुक्ती पुरस्कार व हगनदारी मुक्त आदर्श गाव पुरस्कार मिळाला असून या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेले शौचालय मात्र दहा वर्षापासून चोरीला गेल्याने येथील नागरिक संभ्रमात पडले आहेत