निंगणूर गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा भव्य रक्तदान शिबिर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री आणि कोरोणा महामारी च्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज दिनांक २९-०१-२०२१ रोजी निंगणूर येथे गावातील सर्व जातीधर्मातील लोक यांनी जातीय सलोखा कायम रहावा म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले.व त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान ही केले. पोलीस स्टेशन बिटरगांव व निंगणूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. विजय चव्हाण साहेब व त्यांची सर्व टीम यांनी रक्तदान करून सहकार्य केले. उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निगनुर गावांमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले
निंगणुर या पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक वावरत असतात या वर्षी निगनुर येथील बादशहा बाबा यांची यात्रा कोरोना या बिमारी मुळे रद्द झाली असून तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून निंगणूर येथील ग्रामस्थ व पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने निगनुर गावी प्रथमच भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले
गावातील पहिली यशस्वी चळवळ पार पडली. गावातील पाहिले रक्तदान शिबिर फार मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये प्रामुख्याने रक्त दाते 101 रक्तदान शिबिरास गावकऱ्यांचा उत्स्फुर्त
प्रतिसाद मिळाला...

विशेष प्रतिनिधी निंगणुर