आमचा राजाच घाबरलेला असला, तर प्रजा घाबरणारच ; मनसे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Anchor :- अंबरनाथ राज्य सरकारने मध्य रेल्वेवर सर्वसामान्य नागरिकांना देखील प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र शासनाने आखून दिलेल्या वेळेत सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करायचं कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अंबरनाथमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना विचारला असता, "आमचा राजा घाबरलेला आहे, तर प्रजा घाबरणार" असं त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
अंबरनाथमध्ये मनसेच्या वतीने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अंबरनाथ शहरात प्रत्येक ठिकाणी मनसेच्या कार्यालयांचे उदघाटन शनिवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याहस्ते पार पडले, तर मनसेच्या माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या अथक प्रयत्नाने कानसई मोहन पुरम गेट नंबर ३ याठिकाणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी "आदर्श शिक्षक साहित्यिक कै. अरुण मैड ज्येष्ठ नागरिक कट्टा" व "सेल्फी पॉईंट"चे लोकार्पण आमदार राजू पाटील यांच्याहस्ते व मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी काका मांडले, बंडू देशमुख, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, धनंजय गुरव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने सुरू केलेल्या रेल्वेच्या निर्णयाचा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकीकडे एमएमआर क्षेत्रात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांचे हे वाहतूक कोंडीत व्याकुळ होत आहे, त्यातच रेल्वे बंद असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
*नगरसेविका अपर्णा भोईर यांची लाठीकाठी*
नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या माध्यमातून कानसई परिसरात महिला आमी मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या महिला आणि मुलींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. विशेष म्हणजे नगरसेविका अपर्णा यांनीही याठिकाणी लाठीकाठी चालवत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आमदार राजू पाटील यांनीही अपर्णा भोईर यांचे यावेळी विशेष कौतुक केले.