एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी?
आम्ही याचा शोध घेत आहोत व आज या संदर्भात कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली आहे.
रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे प्रकरण आता अधिकच तापणार असल्याचं दिसत आहे. बालाकोट येथील हल्ल्याबाबतची माहिती अर्णब यांना अगोदरपासून होती, एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी तसेच, याप्रकरणी आज कॅबिनेटची बैठक देखील बोलावण्यात आली असून, त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हायरल झालेल्या संभाषणाची आम्ही संपूर्ण माहिती मिळवत आहोत. त्यात काही बालाकोट एअर स्ट्राईक व पुलवामा हल्ल्या सारख्या संवेदशनील बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
या अगोदर या व्हॉट्सअॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केलेली आहे. “गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग याचा पुरावा आहे की, भाजपाच्या कार्यकाळात झालेला बालाकोट एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. हा ड्रामा उघड करण्यासाठी काँग्रेस लवकरच मोठी पत्रकार परिषद घेणार असून याप्रकरणी गंभीरपणे चौकशीची मागणी करणार आहे.”असं काँग्रेसकडून ही सांगण्यात आलेलं आहे.
~आ.गृहमंत्री अनिलजी देशमुख