राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ. निर्मला सावळे आणि माजी विरोधी पक्षनेते डॉ. आसिफ शेख यांनी पक्षात प्रवेश केला.
"एकेकाळी मिरा-भाईंदर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ होते मात्र काही गोष्टीमुळे कार्यकर्त्यांनी पक्षांतर केलं. आता पुन्हा एकदा मिरा-भाईंदर मधील लोकं आपल्या पक्षाकडे वळत आहेत.” असे ना. जयंत पाटील यावेळी म्हणाले.
सौ. निर्मला सावळे यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील जयंत पटेल, दुर्गेश शेळके, रघुनाथ महाजन, शकिल अहमद, नामांकित व्यापारी जतिंदर सिंह मोंगा, निकीता छाबरिया, सोनिया छाबरिया आणि सुविंदर सिंह यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला.
Jayant Patil - जयंत पाटील
#NCP #पक्षप्रवेश