Type Here to Get Search Results !

मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा मार्ग निवडू नये , असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले



राज्य लोकसेवा आयोगाने ( एमपीएससी ) मराठा समाजाच्या उमेदवारांना ' एसईबीसी'ऐवजी आर्थिक मागास समाजाचे आरक्षण देता येणार नाही , असा अर्ज बुधवारी सुप्रीम कोर्टात दाखल केला होता . या निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री ना . अजितदादा पवार यांनी नाराजी व्यक्त केली . काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली असून मुख्य सचिवांना याबाबतचे आदेश दिले आहेत . एमपीएससीचे शपथपत्र मागे घेणार असल्याबाबतचे सुतोवाच अजितदादांनी केले . एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे . त्यांना त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत . मात्र राज्यात एखादा विषय सुरु असताना त्यावरील निर्णय घेण्याआधी एकदा मुख्य सचिवांना विश्वासात घ्यायला हवे होते , असे स्पष्ट मत अजितदादा यांनी व्यक्त केले . तसेच मराठा आरक्षणावरील सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आल्यामुळे औरंगाबाद येथे एका तरुणाने क्रांती चौकात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला . मराठा आरक्षणासाठी झालेली आत्महत्या ही दुर्दैवी असल्याचे अजितदादा यांनी सांगितले . काही विषय हे राज्याच्या अंतर्गत न राहता सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहेत . त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ देणे गरजेचे आहे . त्यामुळे मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा मार्ग निवडू नये , असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News