पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकास पवार तर कार्याध्यक्षपदी दिनेश खंडेलवाल
पंढरपूर पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर
पत्रकारांच्या हिताचे कार्य करू- पवार
पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील - खंडेलवाल
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुनश्च विकास पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी दिनेश खंडेलवाल यांची निवडही सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ शहापूरकर माजी अध्यक्ष प्रवीण नागणेे पत्रकार संघाचे सदस्य समाधान भोई, रवी लव्हेकर, सागर आतकरे ,गोपीनाथ देशमुख आदी उपस्थित होते यावेळी पत्रकारांच्या हिताचे प्रश्न सोडवू तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरकुल योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन नूतन अध्यक्ष विकास पवार यांनी दिले तर नूतन कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल म्हणाले की पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू त्याच बरोबर पत्रकारांच्या शासन स्तरावरील विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार हिताचे कार्यक्रम राबविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान सर्वांच्या वतीने
पत्रकार संघाची कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी संजय कोकरे ,महेश कदम सचिवपदी दगडू कांबळे, सहसचिव गणेश महामुनी, प्रसिद्धीप्रमुख राजू मिसाळ, खजिनदार रफीक आत्तार, सहखजिनदार प्रीतम पंडित,कार्यकारणी सदस्य रवी लव्हेकर, सागर आतकरे, राजू बाबर, समाधान भोई, नवनाथ खिलारे ,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचे सत्कार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी केले अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पंढरपूर पत्रकार संघाची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड सदर बैठकीमध्ये पार पडली आभारप्रदर्शन माजी अध्यक्ष प्रवीण नागणे यांनी मानले