उदघाटन करताना डॉ यशराज पाटील, डॉ एच चव्हाण डॉ. तृप्ती सागळे डॉ अर्जुन काकरानी डॉ एम बरथवाल, डॉ. राहुल साळुंखे आदी.
डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि २५ जानेवारी २०२१ रोजी कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन रुग्णालयाचे कोषाध्यक्ष व विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. तृप्ती सागळे वैद्यकीय अधिकारी पिचिं मनपा, डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक विभागाचे व्यवस्थापक डॉ. अर्जुन काकरानी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, आदी उपस्थिती होते. डॉ अर्जुन काकरानी यांनी कोविशील्ड लस घेऊन लसीकरण अभियानाचा प्रारंभ केला. "ही लस सुरक्षित असल्याचा संदेश देत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले".
पिचिं मनपा, आरोग्य विभागाने नुकतेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाला कोविड १९ लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार निरीक्षण कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतिक्षालय आदींची स्वतंत्र व्यवस्था करीत सर्व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोर पालन करीत या अभियानाला उत्साहात सुरुवात झाली. दररोज शंभर कोरोना यौद्धांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचनाची माहिती भिंतीपत्रकाद्वारे देण्यात येत असून "मी लसीकरण केले" व ही "लस सुरक्षित"