हान मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन
देहूरोड ता 26 जाने- दरवर्षी शाळेमध्ये ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला असतो. पण कोरोना प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साध्या पध्दतीने साजरा झाला वर्षभर शाळा बंदच आहे. प्रत्येकाच्या शाळेतील साजरा होणारा गणराज्य दिन राहतो त्या ठिकाणी आपण साजरा करावा हा हेतूने घेऊन समर्थ कॉलनी, विकासनगर, किवळे येथील मुलांनी या दिनाचे संपूर्ण नियोजन करीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
साठविलेल्या पॉकेट मनीतून यामुलांनी फुगे, झेंडे, बिल्ले आणि खाऊ आदी आणून. ध्वजारोहण ठिकाणी आकर्षक सजावट करीत देशप्रती आपले पणाची भावना प्रकट केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत रहिवाश्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लहानग्यांनी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करीत नागरीक भारावून गेले.