शिर्डी शहरातील वाढत असणारे अवैध धंदे बंद झाले पाहिजे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी,याबरोबरच कोणत्याही नागरिकांचे शोषण होणार नाही यासह विविध मागण्यांसाठी शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी,शिर्डी पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू केले होते
या पार्श्वभूमीवर शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी,अवैध व्यवसाय व गुन्हेगारी रोखण्यासाठी वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी एक स्वतंत्र पोलीस पथक स्थापन करून एक पोलीस उप निरीक्षक चार पोलिस कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक स्थापन करून कारवाईसाठी सुरुवात करण्यात येईल,असे आश्वासन दिले,
संजय सातव यांनी सांगितले की,अवैद्य व्यवसाय रोखण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्न करीत असतात,मात्र हे व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी जे उपोषण लोकचंदाणी यांनी सुरू केले होते, त्यांच्या असलेल्या मागण्या मान्य करून त्यासाठी तात्काळ विशेष पथक स्थापन करून,कारवाईला देखील सुरुवात करण्यात येईल, असे सांगून हे व्यवसाय बंद करण्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अंमलबजावणी देखील करण्यात येईल असे आश्वासन दिले,यावेळी मागण्या मान्य झाल्या जितेश लो्कचंदाणी यांनी यावेळी आपण उपोषण स्थगित करत असल्याचेजाहीर केली,उपोषण सुरू झाल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी शिर्डी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते,
यावेळी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते,शिवसेनेचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संजय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर,विश्वास माघाडे,प्रा प्रसाद कोते,माजी नगरसेवक व राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार गोंदकर, निमगाव कोराळे ग्रामपंचायत चे सरपंच कैलास कातोरे,माजी सदस्य धनंजय पाटील ,सदस्य रावसाहेब कडलग,अविनाश शेजवळ,किरण पाटील,सामाजिक कार्यकर्ते गिरीश सोनेजी,लहुजी सेनेचे समीर वीर,शहा मुस्ताक आली नवनाथ सदाफळ,संजय शिरे,राजेंद्र दुनबळे,राजेंद्र बनकर,प्रशांत अग्रवाल,अनिल पवार,आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते
विशेष प्रतिनिधी शिर्डी